इडली खाणे बहुतांशजणांना आवडते. पण इडलीच्या रेसिपीसाठी एक दिवस आधी तयारी करावी लागते.
घरच्याघरी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने इडली तयार करू शकता. याची रेसिपी पुढे स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
भाजलेल्या शेवय्या, रवा, दही, मीठ, ईनो, तेल, राई, कढीपत्ता, चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची
तेल गरम करुन त्यामध्ये राई, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची फोडणी तयार करा.
फोडणीमध्ये रवा आणि शेवय्या 3-5 मिनिटे भाजून घ्या. यानंतर मिश्रण थंड होऊ द्या.
मिश्रणात दही मिक्स करुन मिक्सरमध्ये घट्ट वाटून घ्या.
इडलीच्या पीठात ईनो घालून 10 मिनिटे मिश्रण झाकून ठेवा.
इडलीच्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये पीठ घालून 10-15 मिनिटे इडली वाफवून घ्या.
गरमागरम आणि सॉफ्ट इडली चटणी किंवा सांबरसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
घरच्या घरी भेळ पुरी कशी बनवावी?
चहा आणि चपाती खाल्यामुळे शरीराला काय मिळते?
Chanakya Niti : मनुष्याला या 3 चुकांमुळे नरकात जावे लागते
लांब आणि मजबूत नखांसाठी ट्राय करा या 5 Nail Care Tips