वर्षानुवर्षे काहीजण त्याच उशांचा वापर करतात. अस्वच्छ आणि मळलेल्या उशांमधील कापूस घरच्याघरी धुण्यासाठीच्या ट्रिक्स जाणून घेऊया.
सर्वप्रथम उशीमधील कापूस काढून घ्या. काहीवेळेस उशीमध्ये पॉलिस्टर फोमचाही वापर केला जातो.
एका मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी घ्या. यामध्ये 2 चमचे बेकिंग सोडा आणि 1 चमचा लिक्विड साबण मिक्स करुन सॉल्यूशन तयार करा.
उशीच्या आतमधील कापूस किंवा पॉलिस्टर फोम गरम पाण्याच्या सॉल्यूशनमध्ये भिजवून ठेवा. यामुळे त्यामधील दुर्गंधी हळूहळू दूर होईल.
कापसाला चिकटलेला साबण निघून जाण्यासाठी दोन-तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवा.
कापूस किंवा पॉलिस्टर फोम धुतल्यानंतर पिळून घ्या आणि सुकण्यासाठी ठेवा. सुकल्यानंतर त्यावरुन ड्रायर फिरवा.
बेकिंग सोड्याच्या वापर उशी किंवा त्यामधील कापूस स्वच्छ करण्यासाठी करू शकता. यासाठी कापूसवर थोडावेळ बेकिंग सोडा टाकून ठेवा.