घरच्याघरी पालक पराठा कसा बनवावा, प्रोसेस जाणून घ्या
Lifestyle Feb 14 2025
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
साहित्य
२ कप गव्हाचे पीठ, १ कप बारीक चिरलेला पालक, १/२ चमचा जिरे, १/२ चमचा हळद, १/२ चमचा तिखट, १/२ चमचा गरम मसाला, १ चमचा अद्रक-लसूण पेस्ट, १ चमचा तेल, मीठ चवीनुसार, पाणी
Image credits: Freepik
Marathi
पालक प्युरी तयार करा
पालक स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यात २ मिनिटे उकळा आणि लगेच थंड पाण्यात टाका. मिक्सरमध्ये पालक, अद्रक-लसूण पेस्ट आणि थोडंसं पाणी घालून प्युरी बनवा.
Image credits: social media
Marathi
पीठ मळून घ्या
एका परातीत गव्हाचं पीठ, जिरे, हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ घाला. त्यात पालक प्युरी आणि एक चमचा तेल टाकून पीठ मळा. जरुरीप्रमाणे पाणी घालून मऊसर गोळा तयार करा.
Image credits: Freepik
Marathi
पराठा लाटून भाजा
पीठाचे छोटे गोळे करून गोलसर किंवा त्रिकोणी पराठे लाटून घ्या. गरम तव्यावर थोडं तूप/तेल टाकून पराठा दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर भाजून घ्या.
Image credits: Freepik
Marathi
सर्व्हिंग टीप्स
गरमागरम पालक पराठा तुपासोबत किंवा दही, लोणचं, चटणीसोबत सर्व्ह करा. आणखी चवदार बनवण्यासाठी पराठ्यात किसलेलं चीज किंवा भाजलेले तीळ घालू शकता.