उडीद डाळ – 1 कप, तांदूळ (इडली राईस किंवा सादा तांदूळ) – 2 कप, मेथी दाणे – ½ चमचा, मीठ – चवीनुसार, पाणी – आवश्यकतेनुसार
तांदूळ आणि मेथी दाणे वेगळे धुऊन 5–6 तास भिजवून ठेवा. उडीद डाळही वेगळी धुऊन 5–6 तास भिजवा.
प्रथम उडीद डाळ थोडं थोडं पाणी घालून मऊ आणि फेसाळ वाटा. नंतर तांदूळ थोडे खरडे वाटा (जास्त बारिक नकोत). दोन्ही वाटणं एकत्र करून मिक्स करा.
मिश्रण झाकून 8–12 तास गरम जागी ठेवा (रात्री ठेवलं तर सकाळी तयार होतं). मिश्रण फूललं पाहिजे – याचा अर्थ ते चांगलं आंबलं आहे.
आंबलेलं मिश्रण हळुवार हलवा, मीठ घाला. इडली साचामध्ये घाला आणि 10–12 मिनिटं वाफवून घ्या. थोडं थंड झाल्यावर साच्यातून काढा.
मातीच्या भांड्यांमध्ये अन्नपदार्थ शिजवण्याचे 5 आरोग्यदायी फायदे
लिंबाचा रस त्वचेला लावण्याचे फायदे
योगा केल्यामुळं कोणते फायदे होतात?
उन्हाळ्यात या व्यक्तींनी चुकूनही पिऊ नये उसाचा रस