१ कप बेसन, १ टेबलस्पून रवा, १/२ टीस्पून हळद, १ टीस्पून साखर, १ टीस्पून मीठ, १ टीस्पून आले-हिरवी मिरची पेस्ट. १ टीस्पून लिंबाचा रस, १ टीस्पू१ कप पाणी, १ टीस्पून इनो फ्रूट सॉल्ट
एका भांड्यात बेसन, रवा, हळद, साखर, मीठ, आले-हिरवी मिरची पेस्ट, लिंबाचा रस आणि तेल घालून मिक्स करा. त्यात हळूहळू पाणी घालून गाठी न राहता मऊसर मिश्रण तयार करा.
एका भांड्यात पाणी गरम करून वाफेवर ठेवण्यासाठी इडली पात्र किंवा स्टील डबा/प्लेट तयार ठेवा. ढोकळ्याच्या मिश्रणात शेवटी इनो/सोडा घालून लगेच फेटून ग्रीस केलेल्या भांड्यात ओता.
एका पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, तीळ, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या परतून घ्या. त्यात २ टेबलस्पून पाणी + १ टीस्पून साखर घालून उकळी द्या. ही फोडणी तयार ढोकळ्यावर ओता.
अधिक मऊ ढोकळ्यासाठी – मिश्रणात १ टेबलस्पून दही घालू शकता. सोड्याऐवजी इनो वापरणे सर्वोत्तम – ढोकळा अधिक मऊ आणि हलका होतो.