घरच्या घरी पटकन पराठा कसा बनवावा, प्रोसेस जाणून घ्या
Lifestyle Jan 29 2025
Author: vivek panmand Image Credits:Freepik
Marathi
साहित्य
गव्हाचे पीठ – २ कप, पाणी – आवश्यकतेनुसार, मीठ – १/२ चमचा, तेल किंवा तूप – २ चमचे, लोणी / बटर (ऐच्छिक)
Image credits: Freepik
Marathi
पीठ मळणे
एका मोठ्या परातीत गव्हाचे पीठ, मीठ आणि १ चमचा तेल टाका. हळूहळू पाणी घालत मऊसर पीठ मळा. १५-२० मिनिटे झाकून ठेवा.
Image credits: Freepik
Marathi
लाटणे
पीठाचे लहान लहान गोळे बनवा. पोळीप्रमाणे लाटून त्यावर थोडं तेल लावा व चौपट घडी करा. – पुन्हा हलकं लाटून गोलसर किंवा त्रिकोणी आकार द्या.
Image credits: social media
Marathi
तव्यावर पराठा शेकणे
गरम तव्यावर लाटलेला पराठा टाका. एक बाजू हलकी ब्राऊन झाली की तेल किंवा तूप लावून पलटवा. – दोन्ही बाजूंनी कुरकुरीत सोनेरीसर झाल्यावर बाहेर काढा.
Image credits: social media
Marathi
सर्व्हिंग
गरमागरम पराठा लोणी, दही, लोणचं किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.
Image credits: Freepik
Marathi
टीप
पराठा अधिक चविष्ट हवा असेल, तर त्यात बारीक चिरलेला कोथिंबीर, मेथी किंवा मसाले घालून मेथी/आलू पराठा तयार करू शकता. पराठा अधिक मऊ हवं असेल, तर पीठ मळताना थोडं दही घाला.