तव्यावर फाटला जातो बेसनाचा पोळा? वापरा या 5 ट्रिक्स
Lifestyle Jan 29 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Pinterest
Marathi
बेसनाचा पोळा
बेसनाच्या पीठापासून वेगवेगळ्या रेसिपी तयार केल्या जातात. अशातच बेसनाचा पोळा मुलांच्या डब्याला किंवा नाश्तासाठी तयार केला जातो.
Image credits: Pinterest
Marathi
बेसनाचा क्रिस्पी पोळा
बेसनाचा पोळा तयार करताना काहीवेळेस तव्याला चिकटून फाटला जातो. यासाठी काय करावे याबद्दलच्या टिप्स पुढे जाणून घेऊया...
Image credits: Pinterest
Marathi
योग्य प्रमाणात पाणी घाला
बेसनाच्या पोळ्यासाठी पीठ भिजवताना त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी घाला. जसे की, 4 कप बेसनाच्या पीठात 1 कप पाणी घाला. जेणेकरुन पीठ अधिक पातळ होणार नाही.
Image credits: Pinterest
Marathi
तव्यावर तेल घाला
बेसनाच्या पोळ्यासाठी पीठ तव्यावर घालण्यापूर्वी तेल घाला. तेल गरम झाल्यानंतरच पोळ्याचे पीठ तव्यावर पसरवा.
Image credits: Pinterest
Marathi
बटाट्याचा वापर
लोखंडाच्या तव्यावर बेसनाचा पोळा तयार करताना तुटत असल्यास अर्धा बटाटा कापून तेलावरुन फिरवा. यामुळे पोळा तुटला जाणार नाही. याशिवाय स्वच्छ तव्याचा वापर करा.
Image credits: Pinterest
Marathi
तूपाचा करू शकता वापर
तेलाएवजी तूपही तव्याला लावून बेसनाचा पोळा तयार करू शकता. यामुळे पोळा क्रिस्पी आणि चवदार होईल.