पातळ पोहे – २ कप, कांदा – २ मध्यम आकाराचे, मिरी व हळद – प्रत्येकी अर्धा चमचा, मोहरी – १ चमचा, जिरं – अर्धा चमचा, हिरवी मिरची – २-३, मीठ – चवीनुसार, शेंगदाणे – २ चमचे. तेल – २ चमचे
Image credits: social media
Marathi
पोहे स्वच्छ धुणे
पोहे चाळणीत घेऊन नळाखाली सावधपणे दोनदा धुवून घ्या. २. त्यात मीठ आणि थोडी साखर टाकून ५ मिनिटे झाकून ठेवा, म्हणजे ते मऊ होतील.
Image credits: social media
Marathi
फोडणी करणे
कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग, शेंगदाणे, हिरवी मिरची, करीपत्ता आणि कांदा टाका. कांदा थोडासा गुलाबी आणि मऊ होईपर्यंत परतून घ्या.
Image credits: social media
Marathi
पोहे एकत्र करून घ्या
फोडणीत हळद टाका आणि लगेचच धुतलेले पोहे त्यात मिसळा. हळुवारपणे हलवत २-३ मिनिटं झाकून शिजवा. वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर शिंपडा.
Image credits: social media
Marathi
गरमागरम सर्व्ह करा!
तयार झालेले कांदा पोहे चहा किंवा ताकासोबत सर्व्ह करा. वरून थोडे शेव, अनारदाणे किंवा नारळ टाकून अधिक चविष्ट बनवा!