हॉटेलसारखी चिकन करी घरच्या घरी कशी बनवावी, प्रोसेस जाणून घ्या
Lifestyle Feb 07 2025
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
चिकन करी घरच्या घरी बनवता येते
चिकन करी घरच्या घरी पटकन बनवता येते. आपण हॉटेलसारखी चिकन करी पटकन बनवता येते.
Image credits: Social Media
Marathi
साहित्य
चिकन – ५०० ग्रॅम, तेल – ३-४ टेबलस्पून, सुकं खोबरं – २ टेबलस्पून, काजू – ५-६, टमाटे – २ मध्यम, कांदे – २ मोठे, दही – २ टेबलस्पून
Image credits: social media
Marathi
मसाला तयार करणे
एका कोरड्या कढईत सुकं खोबरं, काजू आणि कांदा परतून घ्या. थंड झाल्यावर हे मिक्सरमध्ये वाटून पेस्ट बनवा.
Image credits: social media
Marathi
चिकनला मॅरिनेट करणे
चिकनमध्ये दही, हळद, मीठ, आणि आले-लसूण पेस्ट घालून ३० मिनिटं मॅरिनेट करून ठेवा.
Image credits: social media
Marathi
हॉटेल स्टाइल ग्रेवी बनवणे
एका भांड्यात तेल गरम करून त्यात तेजपत्ता, लवंग, दालचिनी, मोहरी घाला. कांदा टाकून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर आले-लसूण पेस्ट आणि चिकन मसाला घालून ५ मिनिटं परता.
Image credits: pexels
Marathi
चिकन शिजवणे
आता मॅरिनेट केलेले चिकन टाका आणि १० मिनिटं परतून घ्या. नंतर १-२ कप गरम पाणी घाला आणि झाकण ठेवून १५-२० मिनिटं मंद आचेवर शिजू द्या. मध्ये मध्ये हलवत राहा आणि चव बघून मीठ ऍड करा.
Image credits: pexels
Marathi
सर्व्हिंग टिप्स
ही हॉटेल स्टाइल चिकन करी गरमागरम भात, पराठा किंवा तंदूरी रोटी सोबत सर्व्ह करा. वरून कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकल्यास अजून स्वाद वाढेल.