चला, घरीच्या घरी आलं-लसूण पेस्ट कशी बनवायची ते पाहूया.
आलं: २५० ग्रॅम, लसूण: १५० ग्रॅम, खाण्याचं तेल: १ चमचा, मीठ: चवीनुसार.
सर्वात आधी आलं आणि लसणाची सालं काढून घ्या. त्यानंतर ते उन्हात थोडे वाळवून घ्या.
आलं आणि लसणामधील ओलावा कमी झाल्यावर, त्याचे लहान-लहान तुकडे करा.
आता मिक्सरच्या भांड्यात आल्या-लसणाचे तुकडे, मीठ आणि तेल घालून त्याची पेस्ट तयार करा.
पेस्ट तयार करताना त्यात पाण्याचा एक थेंबही टाकू नका. पाण्यामुळे पेस्ट लवकर खराब होऊ शकते.
तयार झालेली पेस्ट एका हवाबंद डब्यात भरून ठेवा. असं केल्यास ती १५ दिवसांपर्यंत खराब होणार नाही.
चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी लावा 'या' गोष्टी, लगेच दिसेल फरक!
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेवेळी नेसू शकता या डिझाइन्सच्या साड्या
नेकलेस दिसेल रिअल डायमंडसारखा, 1K मध्ये करता येईल खरेदी
महिलांनी डार्क चॉकलेट खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे, रहाल तंदुरुस्त