4-5 मध्यम आकाराचे बटाटे, पाणी, मीठ, 2-3 चमचे कॉर्नफ्लोअर (ऐच्छिक), तळण्यासाठी तेल
बटाटे सोलून लांबट आणि बारीक फ्रायच्या आकारात कापा. बटाट्यांचे तुकडे एका मोठ्या भांड्यात पाण्यात 30 मिनिटे भिजवून ठेवा.
पाण्यात मीठ घालून बटाटे 5-6 मिनिटे उकळा. बटाटे थोडे सैल होईपर्यंत उकळवा, पण पूर्ण शिजू देऊ नका.
बटाटे गार पाण्यात टाकून लगेच गार करा. त्यानंतर स्वच्छ कपड्यावर किंवा टिशू पेपरवर ठेऊन वाळवा.
बटाट्यांना हलकासा कॉर्नफ्लोअर लावा. यामुळे तळल्यानंतर फ्रेंच फ्राईज अधिक कुरकुरीत होतात.
तेलात फ्रेंच फ्राईज टाकून ते टाळून घ्या. त्यानंतर त्याला मसाला लावून ते खाण्यासाठी सर्व्ह करून घेऊ शकता.