अंडी – 2, कांदा – 1 मध्यम, टोमॅटो – 1, कोथिंबीर – थोडीशी, हिरवी मिरची – 1, मिरी पूड – ½ टीस्पून, मीठ – चवीनुसार, लिंबाचा रस – ½ टीस्पून, टोमॅटो सॉस / ग्रीन चटणी – लावायला
पीठ मळून पोळीसारखा गोळा करून 10 मिनिटं झाकून ठेवा. लहान लहान गोळे करून पोळ्या लाटा आणि दोन्ही बाजूंनी थोड्या तेलावर शेकून घ्या
एका बाऊलमध्ये अंडी फोडा, त्यात कांदा, मिरची, मीठ, मिरी पूड घालून फेटा.
तव्यावर थोडं तेल टाका, त्यावर एक पोळी ठेवा. त्यावर फेटलेलं अंडं ओता आणि चमच्याने पसरवा. पोळी उलटा करून दुसरी बाजू शेकून घ्या.
तयार झालेल्या अंडा पोळीवर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चटणी/सॉस लावा. वरून लिंबाचा रस पिळा आणि रोल करून गरम गरम सर्व्ह करा.
हवं असल्यास चीज, मेयो किंवा पनीर सुद्धा भरावू शकता. ही रेसिपी लंचबॉक्ससाठीही एकदम भारी आहे!
रात्री कोकोनट ऑइल डोक्याला लावल्यानं काय फायदा होतो?
उन्हाळ्यात घरच्याघरी Cold Mocha कसा बनवावा?
Tamannaah Bhatia चे 5 डीप नेकलाइन ब्लाऊज डिझाइन, दिसाल मनमोहक
वारंवार पोट फुगते? करा हे 5 घरगुती उपाय