Marathi

घरच्या घरी खुसखुशीत इडली कशी बनवावी, पद्धत जाणून घ्या

Marathi

खुसखुशीत इडली घरी बनवता येईल

खुसखुशीत इडली घरच्या घरी बनवता येईल, आपण अशा इडली घरच्या घरी सहजपणे बनवू शकता. इडली आपण सांबर आणि चटणीसोबत खाऊ शकता. 

Image credits: social media
Marathi

साहित्य

उडीद डाळ – 1 कप, इडली रवा (तांदळाचा रवा) – 2 कप, मीठ – चवीनुसार, पाणी – आवश्यकतेनुसार, तेल – इडली स्टँडला ग्रीस करण्यासाठी 

Image credits: social media
Marathi

सर्वात आधी पीठ तयार करून घ्या

  • उडीद डाळ 4-5 तास भिजवा.
  • इडली रवा वेगळा भिजत ठेवा (फक्त 2-3 तास).
  • उडीद डाळ मऊसर वाटून घ्या (पाणी थोडकंच वापरा).
  • इडली रवा चांगला पिळून काढून उडीद डाळीच्या पिठात मिसळा.
Image credits: social media
Marathi

इडली वाफवा

  • दोन्ही घटक एकत्र करून त्यात मीठ घाला आणि मिश्रण फुगण्यासाठी 8-10 तास ठेवा. इडली पात्राला तेल लावून ग्रीस करा.
  • तयार पीठ इडली मोल्डमध्ये भरा, पण पूर्णपणे भरू नका (फुगायला जागा ठेवा)
Image credits: social media
Marathi

सर्व्ह करून घ्या

  • वाफ आल्यावर इडली मोल्ड पात्रात ठेवा आणि 10-12 मिनिटे वाफवून घ्या.
  • एक टुथपिक किंवा चाकू इडलीत घालून तपासा; ती स्वच्छ बाहेर आली तर इडली तयार आहे.
  • इडली सर्व्ह करून घ्या. 
Image credits: social media
Marathi

इडली खुसखुशीत बनवा

  • उडीद डाळ व्यवस्थित फुलल्याने इडली खुसखुशीत होते.
  • पीठ मिक्स करताना गुठळ्या राहू देऊ नका.
  • वाफवताना झाकण उघडण्याचा प्रयत्न करू नका; त्यामुळे इडली फुलण्यावर परिणाम होऊ शकतो.
Image credits: social media

पितळाची भांडी चमकवण्याचे सोपे घरगुती उपाय

पार्टनर होईल लट्टू, ट्राय करा Katrina Kaif सारखे 7 सेक्सी आउटफिट्स

वजन कमी करण्यासाठी नवीन वर्षात किती चालावं, जाणून घ्या

नवीन वर्षात केस गळतीपासून सुटका कशी मिळवावी, उपाय जाणून घ्या