3–4 शिळ्या चपात्या, 2 टेबलस्पून तेल, ½ टीस्पून मोहरी, ½ टीस्पून जिरं, 7–8 कढीपत्त्याची पानं, 1–2 हिरव्या मिरच्या (चिरलेल्या), ¼ टीस्पून हळद, ¼ टीस्पून लाल तिखट (आवडीनुसार)
चपात्या बारीक तुकड्यांमध्ये फाडून थोडं सुकवून ठेवा किंवा थोडं भाजून मग मिक्सरमध्ये जाडसर चुरा करा.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाका. – थोडंसं तळून हळद, तिखट, मीठ, साखर टाका.
आता चपातीचा चुरा टाकून सर्व मसाल्यांमध्ये नीट मिसळा. ५–६ मिनिटं मंद आचेवर परतवा.
शेवटी वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाका.
अधिक कुरकुरीट हवा असल्यास चपातीचे तुकडे तव्यावर थोडे भाजून घ्या. शिळ्या पोळ्यांऐवजी फुलका, पराठा वापरला तरी चालतो
उन्हाळ्यात लुटा आंब्याचा स्वाद, तयार करा या 5 Recipes
चाळीशीतही दिसाल तरुणी, डेली रुटीनमध्ये फॉलो करा या गोष्टी
घराची शोभा वाढवतील हे 5 Artificial Plants
उन्हाळ्यात घराला थंडाव्यासह द्या नवा लुक, लावा 7 Heat Beat Curtains