वाढलेल्या वजनामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि थायरॉइडसारखे आजार उद्भवू शकतात.
वाढलेल्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यायाम आणि डाएटचा आधार घ्यावा.
आरोग्य तज्ज्ञांनुसार, एका आठवड्याभरात 0.05 ते 1 किलोग्रॅमपर्यंत वजन कमी करणे सुरक्षित मानले जाते.
वेगाने वजन कमी होत असल्यास शरिरातील स्नायूंना इजा होण्याची शक्यता निर्माण होते. याशिवाय थकवा आणि मेटाबॉलिज्मवरही परिणाम होतो.
वेगाने वजन कमी करण्यासाठी तुम्ही फळं आणि भाज्यांचे सेवन करू शकता.
वजन कमी करण्यासाठी दिवसाची सुरूवात द्रव्य पदार्थांच्या सेवनाने करा. सकाळी उपाशी पोटी लिंबू पाणी प्या. दुपारी ताक आणि रात्री सूपचे सेवन करू शकता.
वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी झोपेची एक वेळ निश्चित करा.
वजन कमी करण्यासाठी तणावापासून दूर राहा. अन्यथा तणावाखाली काहीजण प्रमाणाबाहेर फूडचे सेवन करतात. अशातच वजन वाढले जाते.
वजन कमी करायचे असल्यास डाएटसह दररोज हलक्या स्वरूपाचा 15-20 मिनिटे व्यायाम करा. यामुळेही आठवड्याभरात एक किलो वजन कमी होण्यास मदत होईल.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.