प्रत्येक वर्षी 1 मे रोजी कामगार दिवस साजरा केला जातो. या दिवशी कामगारांच्या हक्कांसाठी जनजागृती केली जाते.
कामगार दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे, कामगारांच्या हक्कासांसाठी आवाज उठवणे, त्यांना हक्क मिळवून देणे असा आहे.
कामगार दिनाची सुरूवात 1 मे 1886 मध्ये अमेरिकेतील कामगारांच्या आंदोलनापासून झाली होती. या आंदोलनामागील मुख्य कारण म्हणजे कामचे तास कमी करणे.
कामगारांनी आंदोलन सुरू केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. यामध्ये अनेक कामगारांचा मृत्यू होण्यासह बहुसंख्येने कामगार जखमीही झाले होते. तरीही आंदोलन थांबले नाही.
कामगारांनी जवळजवळ तीन वर्ष आंदोलन केले. यानंतर वर्ष 1889 मध्ये मजूरांच्या आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय समाजवादी सम्मेलनाची एक बैठक झाली असता कामगार आठ तास काम करतील असा निर्णय घेतला.
सम्मेलनात 1 मे रोजी कामगार दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यामुळेच प्रत्येक वर्षी 1 मे रोजी कामगार दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.
भारतात कामगार दिन साजरा करण्याची सुरूवात जवळजवळ 34 वर्षांनंतर झाली. येथील कामगारांनी 1 मे 1923 रोजी चेन्नईत कामगार दिवस साजरा केला.
कामगार दिवस त्यावेळी मद्रास दिन म्हणून साजरा केला. याची सुरूवात भारतीय मजदूर किसान पार्टीचे नेते कामरेड सिंगारावेलु चेट्यार यांनी सुरू केली होती.