तंदुरुस्त राहण्यासाठी दुपारचं जेवण कसं करावं, माहिती जाणून घ्या
Lifestyle Jan 28 2025
Author: vivek panmand Image Credits:Freepik
Marathi
प्रथिनयुक्त पदार्थ
डाळी, उसळी, पनीर, सोयाबीन, किंवा चिकनसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. प्रथिनामुळे स्नायू मजबूत होतात आणि दीर्घकाळ पोट भरलेले राहते.
Image credits: Freepik
Marathi
तृणधान्ये
ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा गहू यापासून बनवलेल्या पोळ्या किंवा भात खा. पूर्ण धान्ये फायबरयुक्त असल्याने पचन सुधारते.
Image credits: Freepik
Marathi
भाज्या
हिरव्या पालेभाज्या, भेंडी, गाजर, आणि कोशिंबिरीसाठी उपयुक्त भाज्या खा. भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात.
Image credits: instagram
Marathi
सालासकट कडधान्ये
मटकी, मूग, चवळी यांसारखे कडधान्ये प्रथिन आणि फायबरचा उत्तम स्त्रोत आहेत.
Image credits: instagram
Marathi
फळं आणि ताक
जेवणानंतर ताक प्या; हे पचन सुधारते. फळं खाल्ल्याने शरीराला अँटिऑक्सिडंट्स मिळतात.
Image credits: instagram
Marathi
तुपाचा समतोल वापर
पोळीवर किंवा भातावर कमी प्रमाणात तूप लावल्याने पचन सुधारते आणि चव वाढते.
Image credits: instagram
Marathi
दुपारच्या जेवणात टाळायच्या गोष्टी
जास्त तळकट पदार्थ खाणे टाळा. चटके, लोणच्यांचे अति सेवन टाळा. जास्त प्रमाणात मिठाचा किंवा साखरेचा वापर टाळा. कोल्ड्रिंक्स किंवा सोडायुक्त पेय दुपारच्या जेवणासोबत पिऊ नका.