गॅस किंवा ब्लोटिंगची समस्या सध्या सामान्य झाली आहे. यामागील कारण म्हणजे चुकीची खाण्यापिण्याची सवय आणि तणाव. यावर आयुर्वेदिक उपाय काय जाणून घेऊया.
आल्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारली जाते. याशिवाय गॅसची समस्याही दूर होते. यामधील अँटी-इंफ्लेमेटरी गुण पोटाला येणारी सूज आणि दुखणे शांत करतात.
गॅस आणि ब्लोटिंगची समस्या उद्भवल्यास लहान आल्याचा तुकडा कापून चावून खा किंवा कप आल्याची चहा प्या.
जीरे आणि ओव्याचे सेवन केल्याने गॅसची समस्या दूर होऊ शकते. याशिवाय पोटाला येणारी सूजही कमी होते. जीरे आणि ओवा एकत्रित मिक्स करुन खाल्ल्याने ब्लोटिंगच्या समस्येपासून आराम मिळेल.
हिंगाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे पोट स्वच्छ होणे, पोटाला येणारी सूज कमी होते. यासाठी चिमूटभर हिंग कोमट पाण्यातून प्या.
हळदीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारली जाते. यामधील करक्यूमिन तत्व सूज आणि दुखणे कमी करण्यास मदत करतात.
पुदीना देखील गॅस आणि ब्लोटिंगच्या समस्येवर फायदेशीर ठरतो. यासाठी पुदीन्याची पाने चावून खा.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.