घरातील खिडकीच्या सजावटीसाठी अशाप्रकारचे ट्रान्सपेरेंट पडदे 1 हजार रुपयांपर्यंत ऑनलाइन पद्धतीने खरेदी करू शकता. याशिवाय पडद्यांच्या बाजूला गोल्डन लाइनचा वापर करा.
घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये अशाप्रकारची लहान रोप ठेवू शकता. या रोपांमुळे घराला आकर्षक लूक येईल.
लिव्हिंग रुममधील सोफ्यासाठी रंगीत उशीची कव्हर खरेदी करू शकता.
घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीच्या जवळ मोकळी जागा असल्यास अशाप्रकारे खुर्ची, टेबल ठेवू शकता. यावर पुस्तके आणि कँडल्स ठेवू शकता.
पाहुणे घरी आल्यानंतर त्यांना नाश्ता देण्यासाठी सुंदर मिनाकारी डिझाइन असणारा टी ट्रे 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
घराच्या भितींची शोभा वाढवण्यासाठी मिनिमल आर्टच्या फोटो फ्रेम्स खरेदी करू शकता.
बेडरुममध्ये अशाप्रकारचा भितींला टेकून राहणारा आरसा खरेदी करू शकता. यामुळे बेडरुमला वेगळा लूक येईल.