होळी आणि रंगपंचमीचा सण आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण घेऊन येतो. यावेळी वेगवेगळ्या रंगांची उधळण केली जाते. अशातच यंदाच्या रंगपंचमीसाठी घरच्याघरी नैसर्गिक रंग तयार करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
घरच्याघरी तयार करा रंग
फुलांपासून नॅच्युरल रंग कसे तयार करायचे याची कृती पुढे सविस्तर जाणून घेऊया.
Image credits: Social Media
Marathi
जास्वंद
जास्वंदाच्या फुलांपासूनही होळीसाठी रंग तयार करू शकता. यासाठी फुलं सुकवून त्याची पावडर तयार करावी लागेल. या फुलांपासून गुलाबी किंवा लाल रंग तयार करता येऊ शकतो.
Image credits: pinterest
Marathi
झेंडूची फुले
पिवळा किंवा केशरी रंग तयार करायचा असल्यास झेंडूच्या फुलांचा वापर करू शकता.
Image credits: Social media
Marathi
लॅव्हेंडरची फुले
होळीसाठी जांभळा रंग तयार करायचा असल्यास लॅव्हेंडरच्या फुलांचा वापर करा. याचा सुवासही दीर्घकाळ टिकणारा असतो.
Image credits: social media
Marathi
हिरवा रंग
कडुलिंबाच्या पानांपासून होळीसाठी हिरवा रंग तयार करू शकता. यामध्ये चंदन पावडरही मिक्स करा.
Image credits: Social Media
Marathi
असे तयार करा रंग
रंग तयार करण्यासाठी फुलं किंवा पाने उन्हामध्ये कडकडीत सुकवून घ्या. यानंतर मिक्सरमध्य वाटून बारीक पावडर तयार करा. होळीच्या दिवशी या नैसर्गिक रंगांची उधळण करा.