पोटफुगीच्या समस्येवर रामबाण उपाय, प्या हे 5 ड्रिंक्स
Lifestyle Dec 05 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
पोटफुगीच्या समस्येवर ड्रिंक्स
बहुतांशजणांना खाल्ल्यानंतर पोटफुगीची समस्या निर्माण होते. यामुळे पोट भरलेले वाटते आणि काही खाण्याची इच्छा होत नाही. यामुळे पोटदुखीवर रामबाण उपाय म्हणून पुढील ड्रिंक्स पिऊ शकता.
Image credits: Social media
Marathi
जल जीरा
जल जीरा प्यायल्याने गॅस, बद्धकोष्ठता किंवा पोटफुगीच्या समस्येपासून दूर राहू शकता. जीऱ्यामध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
Image credits: Social Media
Marathi
आल्याची चहा
आल्याच्या चहामुळे गॅस आणि पोटफुगीची समस्या कमी होते. आल्यामधील अँटी-इंफ्लेंमेंटरी गुणधर्मामुळे तुम्ही पोटासंबंधित समस्येपासून दूर राहू शकता. यावेळी चहामध्ये दूध मिक्स करणे टाळा.
Image credits: Getty
Marathi
लिंबू पाणी
लिंबूमध्ये साइट्रिक अॅसिड असल्याने पोटाच्या समस्येसाठी फायदेशीर ठरते. शौचास समस्या उद्भवत असल्यास किंवा पोट स्वच्छ होण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करू शकता.
Image credits: Social media
Marathi
बदामाचे दूध
बदामाच्या दूधात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. याशिवाय व्हिटॅमिन ए, डी, प्रोटीन अशी पोषण तत्त्वेही शरिराला मिळतात. बदामाचे दूध प्यायल्याने गॅस, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
Image credits: Freepik
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.