भारतातील विविध आश्रम त्यांच्या शांत वातावरणासाठी आणि आध्यात्मिक अनुभवांसाठी प्रसिद्ध आहेत. ही ठिकाणे तुम्हाला एक पैसाही खर्च न करता राहण्याची आणि खाण्याची परवानगी देतात.
नव्या वर्षाचे स्वागत तुम्हाला पार्टी न करता शांततेत करायचे आहे का? तर मग शहराच्या कोलाहलापासून दूर शांततेत क्षण घालवायचे असतील तर हे आश्रम तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.
ऋषिकेश हे उत्तराखंडचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. गंगा नदीच्या काठावर गीता भवनात 1000 हून अधिक खोल्या आहेत, जिथे तुम्ही विनामूल्य राहू शकता. येथे स्वादिष्ट भोजन, शांत वातावरण मिळेल.
केरळमध्ये स्थित आनंदाश्रम हे शांतता, समाधान शोधण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्हाला घरासारखे जेवण मोफत मिळते. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे ठिकाण मानसिक शांतीसाठी आदर्श आहे
कोईम्बतूर येथे स्थित ईशा फाऊंडेशन त्याच्या विशाल आदियोगी शिवाच्या पुतळ्यासाठी प्रसिद्ध आहे आणि वेलियांगिरी टेकड्यांनी वेढलेले आहे. येथे तुम्हाला मोफत निवास आणि भोजन सुविधा मिळते.
तिरुवन्नमलाईच्या टेकड्यांमध्ये वसलेला, हा आश्रम मोफत निवास आणि पौष्टिक शाकाहारी भोजन प्रदान करतो. तुम्ही तुमचा मुक्काम किमान सहा आठवडे अगोदर बुक करणे आवश्यक आहे.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड दरम्यान मणिकरण येथे स्थित, हे गुरुद्वारा मोफत निवास आणि लंगर देते. आध्यात्मिक शांती शोधणाऱ्या लोकांसाठी हे ठिकाण योग्य आहे.
निरोगी राहणीमान, अध्यात्माशी संबंधित अभ्यासक्रमांसाठी आश्रम प्रसिद्ध आहे. येथे, स्वयंसेवक कार्यक्रमांद्वारे जगभरातील लोकांना भेटण्याची, आश्रमाच्या कार्यात योगदानाची संधी मिळते.
बंगळुरू, पुणे यांसह अनेक ठिकाणी असलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रम स्वयंसेवक कार्यक्रमांद्वारे निवास आणि भोजनाची सोय करतात. स्वच्छता, बागकाम अशा कामात स्वयंसेवक भाग घेतात.