जेवल्यानंतर खाल्लेले अन्नपदार्थ पचण्यासाठी दररोज 1 खास योगासन करावे. याबद्दलच पुढे जाणून घेऊया.
जेवणानंतर दररोज वज्रासन स्थितीत बसा. यामुळे हेल्दी राहण्यास मदत करेल.
पचनक्रिया सुधारण्यासाठी दररोज वज्रासन करा. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि पोटासंबंधित अन्य समस्या दूर राहण्यास मदत होईल.
पाठीच्या कण्यासाठी वज्रासन करणे फायदेशीर ठरेल. यामुळे पाठीच्या कण्याचे दुखणे आणि शरिराचे पॉश्चर ठिक राहण्यास मदत होईल.
खुर्चीवर बसून काम करणाऱ्यांना पाठ आणि कंबर दुखीचा त्रास सहन करावा लागतो. या त्रासापासून आराम मिळण्यासाठी वज्रासन करा. यामुळे स्नायू मजबूत होण्यास मदत होईल.
सतत पाय दुखत असल्यास वज्रासन स्थितीत थोडावेळ बसा. यामुळे पाय दुखण्याच्या समस्येपासून थोडा आराम मिळेल.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.