सर्वप्रथम गव्हाचा पास्ता थोड्या मिठाच्या पाण्यात उकळा. गाळून बाजूला ठेवा. एकमेकांना चिकटू नये म्हणून एक चमचा तेलही पाण्यात मिसळा.
एक पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करा, त्यात शिमला मिरची, स्वीट कॉर्न आणि टोमॅटो हलके परता.
आता त्यात टोमॅटो प्युरी, मीठ, काळी मिरी, ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घाला. २-३ मिनिटे शिजवा.
आता उकडलेला पास्ता या ग्रेव्हीमध्ये घालून व्यवस्थित मिसळा. २ मिनिटे मंद आचेवर शिजवा.
थोडे थंड झाल्यावर टिफिनमध्ये पॅक करा. वरून थोडा चीज किंवा कोथिंबीरही घालू शकता.
पुण्याच्या अमृततुल्यसारखा गुळाचा चहा असा बनवा घरच्या घरी
फ्लॉलेस मेकअपसाठी वापरा हे 6 Koran Makeup हॅक्स
भाजलेला कच्चा आंबा लागेल लज्जतदार, पटकन थंडावा देईल रोस्टेड आंबा पन्हं
सारा अली खानच्या 6 हेअरस्टाईल, 30 व्या वर्षीही दिसाल स्वीट 16