Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
साहित्य
१.५ कप नाचणीचं पीठ, ४ कप पाणी, १ कांदा, २ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता (आवश्यकतेनुसार), चवीनुसार मीठ आणि डोसा भाजण्यासाठी तेल.
Image credits: social media
Marathi
पीठ भिजवा
एका भांड्यात नाचणीचं पीठ घ्या. त्यात थोडं-थोडं पाणी घालून पीठ तयार करा. पीठ पातळसर ठेवा. आता त्यात चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि मीठ घाला.
Image credits: social media
Marathi
पीठ भिजू द्या
सगळं साहित्य पिठात चांगलं मिसळल्यानंतर, हे मिश्रण १५ ते २० मिनिटांसाठी मुरण्याकरता बाजूला ठेवा. यामुळे डोशाला चांगली चव येते.
Image credits: Social media
Marathi
डोसा कुरकुरीत होईपर्यंत शिजू द्या
गरम तव्याला तेल लावून त्यावर पीठ घाला. डोसा कुरकुरीत होईपर्यंत भाजा. जर डोसा तव्यावरून व्यवस्थित निघत नसेल, तर पिठामध्ये १-२ चमचे तांदळाचं पीठ मिसळा.
Image credits: social media
Marathi
गरमागरम डोसा तयार!
झटपट नाचणीचा डोसा तयार आहे. हा गरमागरम डोसा सांबार आणि नारळाच्या चटणीसोबत खायला खूप छान लागतो.