अनिमा सिद्धीच्या मदतीने हनुमान कधीही अतिशय सूक्ष्म रूप धारण करू शकतात. या सिद्धिच्या मदतीने हनुमान महासागर पार करुन लंकेत पोहोचला असता तेथे ती वापरली.
महिमा सिद्धिच्या मदतीने हनुमान आपले शरीर विशाल करू शकले.
गरिमा सिद्धीच्या माध्यमातून हनुमान स्वतःचे वजन मोठ्या पर्वतासारखे वजनदार करू शकत होते. ही सिद्धी महाभारत काळात हनुमानाने भीमासमोर वापरली होती.
लघिमा सिद्धीमुळे हनुमान स्वतःचा भार पूर्णपणे हलका करू शकत होते आणि ते एका क्षणात कुठेही जाऊ शकतात.
प्राप्ती सिद्धिद्वारे हनुमानाला लगेच काहीही मिळू शकते. प्राणी पक्ष्यांची भाषा समजू शकत होते आणि भविष्य देखील पाहू शकतात.
प्राकाम्य सिद्धीच्या मदतीने हनुमानजी कुठेही जाऊ शकतात. आकाशात ऊंच झेप घेऊ शकत होते आणि हवे तितके दिवस पाण्यात जिवंत राहू शकत होते
ईशित्व सिद्धीद्वारे हनुमानाला अनेक दैवी शक्ती प्राप्त झाल्या. या सिद्धीच्या प्रभावाने हनुमानाने संपूर्ण वानरसेनेचे कुशलतेने नेतृत्व केले होते.
वशित्व सिद्धीमुळे हनुमान जितेंद्रिय आहेत आणि आपल्या मनावर-भावनेवर नियंत्रण ठेवू शकतात.