नूडल्स, शिमला मिरची, गाजर, कांद्याची पात, कोबी, लसूण, हिरवी मिरची, सोया सॉस, व्हिनेगर, चिली सॉस, तेल आणि मीठ
सर्वप्रथम एका भांड्यामध्ये पाणी गरम करुन घ्या. यामध्ये नूडल्स उकळवून घ्या.यानंतर उकळलेले नूडल्स थंड पाण्यातून गाळून घेत त्यावर तेल सोडा.
कढईमध्ये तेल गरम करा आणि यामध्ये लसूण, हिरवी मिरची घालून भाजून घ्या.
तेलामध्ये कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या. यामध्ये शिमला मिरची, गाजर आणि कोबी घालून 2-3 मिनिटे शिजवून घ्या.
भाज्यांमध्ये सोया सॉस, व्हिनेगर, चिली सॉस आणि टोमॅटो सॉससह मीठ घालून शिजवा. यामध्ये उकळवून घेतलेले नूडल्सही मिक्स करुन सर्व सामग्री मिक्स करा.
नूडल्स 2 मिनिटे शिजवून एका प्लेटमध्ये खाण्यासाठी सर्व्ह करा.