शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी मीठाची आवश्यकता असते. पण मीठाचे मर्यादित सेवन करावे असा सल्ला दिला जातो. अन्यथा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
एका दिवसात किती प्रमाणात मीठाचे सेवन करावे हे वय, लाइफस्टाइल आणि आरोग्याची स्थिती यावर अवलंबून असते.
नवजात बाळाला (0-12 महिने) फार कमी प्रमाणात मीठ द्यावे. कारण या वयामध्ये बाळाची किडनी पूर्णपणे विकसित झालेली नसते. यामुळे बाळाला 1 ग्रॅम मीठ द्यावे.
1-3 वर्षातील मुलाला एका दिवसात 2 ग्रॅम मीठ द्यावे.
4-8 वर्षातील मुल मोठी असतात. यावेळी त्यांच्या खाण्यापिण्यातील मीठाचे प्रमाण थोडे वाढवू शकता. या वयातील मुलांना 3 ग्रॅम मीठ द्यावे.
9-18 वर्षातील मुलांना दिवसभरात 5 ग्रॅमपर्यंत मीठ देऊ शकता.
19 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या मुलांना 5 ग्रॅम पर्यंतचे मीठ देऊ शकता.
65 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींनी कमी प्रमाणात मीठाचे सेवन करावे. या वयोगटातील व्यक्ती 5 ग्रॅम पर्यंतचे सेवन करू शकता.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.