२४ कॅरेट सोनं म्हणजे १०० टक्के शुद्ध सोनं. हे पूर्णपणे शुद्ध असून त्याला ९९.९ टक्के शुद्ध सोनं म्हटलं जातं.
Marathi
२२ कॅरेट सोनं
२२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी सर्वात जास्त होतो. 22K सोन्यात चांदी, झिंक आणि निकेल मिसळलेलं असतं. याला ९१.६७ टक्के शुद्ध सोनं म्हणतात.
Marathi
१८ कॅरेट सोनं
१८ कॅरेट सोन्यात ७५ टक्के सोनं असतं. यात तांबे आणि चांदीसारखे इतर धातू मिसळले जातात. साधारणपणे अंगठी आणि चेन बनवण्यासाठी याचा वापर होतो.
Marathi
शुद्ध सोनं कसं ओळखाल?
जेव्हाही तुम्ही सोनं किंवा सोन्याचे दागिने खरेदी कराल, तेव्हा त्यावर BIS मार्क नक्की तपासा.
Marathi
हॉलमार्क ही सरकारी गॅरंटी
भारतात फक्त ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क निर्धारित करतं.
Marathi
सोन्याची पारख कशी करायची
सोन्याच्या दागिन्यांवर व्हिनेगरचे काही थेंब टाका. १५ मिनिटांनंतर दागिना तपासा. जर त्याच्या रंगात कोणताही बदल झाला नाही, तर तुमचं सोनं शुद्ध आहे असं समजा.
Marathi
ही चूक कोणीही करू नका
नेहमी खात्रीशीर दुकानातूनच सोनं खरेदी करा आणि दुकानातून व्हेरिफाईड पावती घ्यायला विसरू नका.
Marathi
पावती जपून ठेवा
सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच त्याची पावतीही जपून ठेवली पाहिजे. नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं.