पावसाळ्याच्या दिवसात पेरूमध्ये किडे आढळून येणे सामान्य बाब आहे. अशातच पेरू खरेदी करण्याआधी काही सोप्या ट्रिक्सने पेरूतील किड्यांबद्दल ओखळू शकता.
पिकलेल्या पेरूचा रंग पिवळा अथवा हिरवा असतो. पण पेरूचा रंग अधिकच हिरवा किंवा त्यावर काळे डाग असल्यास त्यामध्ये किडे असू शकतात.
ताज्या पेरूचा आकार एकसमान असतो. त्यावर डाग अथवा ओबडधोबड नसतो. पेरूचा आकार असमान किंवा त्यावर छिद्र असल्यास त्यामध्ये किडे असू शकतात.
पिकलेला पेरू नेहमीच मऊसर असतो. पण पेरू अधिक कठोर अथवा अधिकच मऊ असल्यास त्यामध्ये किडे असण्याची शक्यता आहे.
पिकलेल्या पेरूला गोडसर वास येतो. मात्र पेरूला वासच येत नसल्यास अथवा सडलेला वास येत असल्यास अशा प्रकारचा पेरू खरेदी करणे टाळा.
पेरूमध्ये किडे आहेत की नाही तपासून पाहण्यासाठी कापून पाहा. कापल्यानंतर पेरूमध्ये काही छिद्र दिसल्यास त्यामध्ये किडे असण्याची शक्यता वाढली जाते.
ऑनलाइन एवजी थेट मार्केटमधून पेरू खरेदी करा. पेरू खरेदी करताना चहूबाजूंनी फिरवून पाहा. याशिवाय एकाचवेळी खूप पेरू खरेदी करू नका.
सणासुदीवेळी परफेक्ट आहेत Sonalee Kulkarni च्या ब्लाऊजचे 8 हटके डिझाइन
वयाच्या पंन्नाशीत महिलांसाठी आवश्यक 3 Vitamin, हाडं होतील बळकट
अडकलेले पैसे येतील परत, करा हळदीचे हे उपाय
मुलीला शाळेत पाठवताना नक्की शिकवा या 8 गोष्टी