२ मध्यम बटाटे, १ कप फ्लॉवर, १/२ कप गाजर, १/२ कप शिमला मिरची, १ कप मटार, ३ चमचे अमूल बटर, १ चमचा तेल, २ चमचे कोथिंबीर, १ लिंबू, ८-१० पाव
कुकरमध्ये बटाटे, फ्लॉवर, गाजर, मटार आणि शिमला मिरची टाका. त्यात १.५ कप पाणी आणि चिमूटभर मीठ घाला. ३-४ शिट्ट्या करून भाज्या मऊ होऊ द्या. शिजल्यानंतर सर्व भाज्या ठेचून गुळगुळीत करा.
पॅनमध्ये १ चमचा तेल आणि २ चमचे बटर गरम करा. त्यात जिरं टाका आणि लगेचच आलं-लसूण पेस्ट घाला. कांदा घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या.
नंतर चिरलेले टोमॅटो घालून ५ मिनिटे परता. हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला, गरम मसाला, धणे पूड, जिरं पूड आणि मीठ घालून परता. आता त्यात शिजवलेल्या आणि ठेचलेल्या भाज्या घाला.
१/२ कप पाणी घालून मंद आचेवर १० मिनिटे शिजवा. शेवटी कसूरी मेथी आणि लिंबाचा रस घालून गॅस बंद करा.