सध्या त्वचेसंबंधित समस्या अधिक वाढल्या गेल्या आहेत. यासाठी महिला ब्युटी पार्लर आणि महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण कालांतराने याचा त्वचेवर परिणाम होतो.
महिला पार्लरमध्ये फेशियल आणि क्लिनअप करतात. पण घरच्याघरीही क्लिनअप करता येऊ शकते.
ग्लोइंग त्वचेसाठी सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यासाठी गरम पाणी वापरा. यानंतर कच्च्या दूधाचा वापर करा. जेणेकरुन त्वचा सखोलपणे स्वच्छ होण्यास मदत होईल.
दूध लावलेला चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्याला स्टिम द्या. जेणेकरुन त्वचेमधील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होईल.
चेहऱ्याला स्क्रब करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे त्वचा हाइड्रेट राहते. यासाठी मध आणि साखरेचा स्क्रब तयार करा.
आठवड्यातून एकदातरी चेहऱ्याला नॅच्युलर फेसपॅक लावा. जेणेकरुन त्वचेला ग्लो येण्यास मदत होईल.
फेसपॅकसाठी मुल्तानी माती, बेसन आणि एलोवेरा जेलचे मिश्रण तयार करा. यामुळे त्वचा मऊसर होईल.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.