वाईट जीवनशैली, कमी झोप, तणावाने डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे सामान्य झाले. चेहरा निस्तेज दिसतो, तुम्ही वयस्कर दिसू लागता. घरगुती नैसर्गिक उपायांनी तुम्ही यावर नियंत्रण मिळवू शकता.
बदाम तेल डोळ्यांखालील त्वचेसाठी फायदेशीर. व्हिटॅमिन E, अँटीऑक्सिडंट्सयुक्त बदाम तेल रक्तवाहिन्या मजबूत करून डार्क सर्कल्स कमी करते. रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली थोडे तेल लावा
काकडीत हायड्रेटिंग गुणधर्म असतात, जे डोळ्यांखालील त्वचेला ताजेपण आणि थंडावा देतात. काकडीचे तुकडे डोळ्यांखाली ठेवा आणि १०-१५ मिनिटे आराम करा. यामुळे डार्क सर्कल्स आणि सूज कमी होईल.
बटाट्यात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C मुळे काळी वर्तुळे कमी होतात. बटाट्याचा रस डोळ्यांखाली २० मिनिटे लावा, नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. बटाट्याचे वापराने त्वचा ताजीतवानी होईल.
चहा पिशव्या अँटीऑक्सिडंट्स, थंडावा देणाऱ्या असतात. ग्रीन टी बॅग्ज थंड पाण्यात भिजवून १५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. नंतर बॅग्जला डोळ्यांवर १० मिनिटे ठेवल्याने काळी वर्तुळे कमी होतात.
वरील घरगुती उपायांचा वापर केल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होऊ शकतात. या उपायांमुळे त्वचा हायड्रेट होते, ताजेपण येते, तुमचा चेहरा तरुण दिसू लागतो. २ दिवसांत परिणाम पाहा!