पोटदुखी, पोट फुगणे, अपचन असे काही यकृताच्या आजाराची लक्षणे असू शकतात.
नेहमी थकवा हा अनेक आजारांचे लक्षण असला तरी यकृताचे आरोग्य बिघडल्यावरही अति थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो.
त्वचा, डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा पडणे हे यकृताच्या आरोग्याच्या बिघाडाचे प्रमुख लक्षण आहे.
शरीरावर खाज सुटणे हे देखील यकृत रोगाशी संबंधित आहे.
शरीरात अचानक वाढणारी चरबी आणि पाण्याची जडणे हे यकृत रोगाचे लक्षण असू शकते.
लघवीचा रंग पिवळा होणे हे आणखी एक लक्षण आहे. लघवी लाल, इतर गडद रंगाची झाल्यास ते दुर्लक्ष करू नका.
भूक न लागणे, अचानक वजन कमी होणे ही देखील यकृत रोगाची लक्षणे असू शकतात.
वरील लक्षणे दिसल्यास स्वतःहून रोग निदान करण्याचा प्रयत्न न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
केसांची नैसर्गिकरित्या वाढ व्हावी म्हणून काय करायला हवं?
शरीरातील प्रोटीनचे प्रमाण वाढवायला काय खायला हवं?
जुन्या स्टाइलला रामराम ठोका, ट्राय करा शिल्पा शेट्टीच्या ८ फ्यूजन साड्या
मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करायला हवं?