Marathi

मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करायला हवं?

Marathi

पुरेशी झोप आवश्यक आहे

मुलांना दररोज ८-१० तास झोप मिळणं अत्यंत आवश्यक आहे. झोपेमुळे मेंदूला विश्रांती मिळते आणि शिकलेली माहिती नीट लक्षात राहते.

Image credits: social media
Marathi

मेंदूसाठी पोषक आहार द्या

बदाम, अक्रोड, फळं, हिरव्या भाज्या, डाळी आणि दूध यामध्ये मेंदू वाढवणारी पोषकतत्त्वं असतात. दररोज सकस आहार दिल्यास लक्ष केंद्रित होण्यास मदत होते.

Image credits: social media
Marathi

ध्यान आणि श्वाससाधना

ध्यान (Meditation) आणि श्वसनाचे व्यायाम मुलांमध्ये एकाग्रता वाढवतात. रोज ५-१० मिनिटांचं ध्यानही खूप फायदेशीर ठरतं.

Image credits: social media
Marathi

रिव्हिजनचा सराव

शालेय अभ्यास दररोज थोड्याथोडक्याने परत पाहण्याची सवय लावा. परत परत वाचल्यामुळे माहिती मेंदूमध्ये दीर्घकाळ टिकते.

Image credits: social media
Marathi

मेंदूला चालना देणारे खेळ

शब्दकोडे, पझल्स, बुद्धीबळ, मेमरी गेम्स – हे खेळ मुलांचा विचार करण्याची क्षमता वाढवतात.

Image credits: social media

मुंबईकरांचा आवडता अमर वडापाव कधी खाल्ला का, हृदयात घर करणारी चव

तुम्हाला सतत भूक लागते? काही तरी खावेसे वाटते? जाणून घ्या यामागची कारणे

लैंगिक क्षमता कमी झाली आहे का? असू शकतो प्रोस्टेट कॅन्सर, जाणून घ्या शारीरिक संकेत

८ ट्रिकी प्रश्न! ९९% लोकांनी दिले चुकीचे उत्तर, तुम्ही एकदा ट्राय करुन बघा