फाटलेल्या दूधापासून वेगवेगळ्या रेसिपी तयार केल्या जातात. अशातच फाटलेल्या दूधापासून टेस्टी सँडविच तयार करू शकता. पाहूया रेसिपीसाठी लागणारी सामग्री आणि कृती सविस्तर...
अर्धा किलो फाटलेले दूध, सँडविच ब्रेड स्लाइस, बटर 2 चमचे, टोमॅटो सॉस, काकडी स्लाइस, ऑरिगॅनो, चिली फ्लॅक्स, काळीमिरी पावडर आणि चवीनुसार मीठ.
सर्वप्रथम फाटलेले दूध गाळून त्यामधून मलई काढा. यानंतर दूधाची पेस्ट तयार करुन एका बाऊलमध्ये काढून ठेवा.
बाऊलमध्ये मीठ, काळीमिरी पावडर, चिली फ्लॅक्स आणि ऑरिगॅनो घालून मिक्स करुन घ्या.
ब्रेड स्लाइसला बटर लावून व्यवस्थितीत भाजून घ्या. यानंतर स्लाइसवर टोमॅटो सॉस लावून घ्या.
ब्रेड स्लाइसवर दूधाची मलाई व्यवस्थितीत पसरवून घ्या. यावर काकडी, टोमॅटो स्लाइस घालून दुसरी स्लाइस त्यावर ठेवा.
चवीसाठी मलईवर थोडा चाट मसाला आणि ऑरिगॅनो स्प्रिंकल करू शकता. अशाप्रकारचे सँडविच हिरवी चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.