दही आणि गुळ या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. पण दही आणि गुळ एकत्रित खावे का असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. याबद्दलच पुढे जाणून घेऊया.
दही आणि गुळाचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते. दह्यामधील प्रोबायोटिक्स आणि गुळातील लोह, मिनिरल्स शरीराला मजबूती देण्यास मदत करतात.
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असल्याने पचनक्रिया सुधारली जाते. याशिवाय गुळामुळे पोट स्वच्छ होते,
दही आणि गुळाचे सेवन केल्याने शरीराला उर्जा मिळते. याचे हेल्दी फूड म्हणून सेवन करू शकता.
दह्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस असल्याने हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी दही आणि गुळाचे सेवन एकत्रित करू शकता. यामुळे पचनक्रिया सुधारली जाते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.