Marathi

सोन्यासारखी चमकेल Artificial Jewellery, या ट्रिक्सने करा स्वच्छ

Marathi

भारतात आर्टिफिशियल ज्वेलरीची मागणी

महिलांना सोन्या-चांदीसह आर्टिफिशियल ज्वेलरी घालणे पसंत असते. यामध्ये नेकलेस ते बांगड्या घातल्यानंतर कालांतराने काळ्या पडतात. याची स्वच्छता कशी करायची कळत नाही.

Image credits: Pinterest
Marathi

घरीच अशी स्वच्छ करा आर्टिफिशियल ज्वेलरी

घरच्याघरीच आर्टिफिशियल ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी पुढील काही ट्रिक्स नक्की कामी येतील.

Image credits: Pinterest
Marathi

बांगड्या स्वच्छ करण्याची ट्रिक्स

बांगड्या स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. लिंबाच्या रसात 20-25 मिनिटे बांगड्या ठेवल्यानंतर हलक्या हाताने ब्रशने त्या स्वच्छ करा.

Image credits: Pinterest
Marathi

कानातले असे करा स्वच्छ

कानातले स्वच्छ करण्यासाठी टुथपेस्टचा वापर करू शकता. टुथपेस्ट पाण्यात मिक्स करुन त्यामध्ये कानातले बुडवून स्वच्छ करु शकता.

Image credits: instagram
Marathi

आर्टिफिशियल नेकलेसची स्वच्छता

आर्टिफिशिय नेकलेसची चमक पुन्हा आणायची असल्यास तो एखाद्या फेस येणाऱ्या कोल्ड्रिंगमध्ये बुडवून ठेवा. यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

Image credits: Pinterest
Marathi

अंगठी अशी करा स्वच्छ

काळवंडलेली अंगठी स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. कोमट पाण्यात बेकिंग सोडा, मीठ मिक्स करुन ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा.

Image credits: Pinterest
Marathi

अशी ठेवा ज्वेलरी

आर्टिफिशियल ज्वेलरी ओलरसपणामुळेही खराब होऊ शकते. यामुळे ज्वेलरी एखाद्या लाकडी बॉक्समध्ये ठेवू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

सोन्या-चांदीसोबत ठेवू नका

आर्टिफिशियल ज्वेलरी कधीच सोन्या-चांदीच्या ज्वेलरीसोबत ठेवू नका. यामुळे प्रत्येक ज्वेलरी वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवा.

Image Credits: Pinterest