नारळाच्या तेलामध्ये अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन ई, लॉरिक अॅसिड, कॅप्रिक अॅसिड, फॅटी आणि अँटी-इंफ्लेंमेंटरी गुणधर्म असतात.
काहीजण थंडीच्या दिवसात चेहऱ्याच्या त्वचेला नारळाचे तेल लावतात. जाणून घेऊया चेहऱ्याला नारळाचे तेल लावावे की नाही याबद्दल पुढे...
नारळाचे तेल मॉइश्चराइजरच्या रुपात वापरले जाते. यामधील एमोलिएंट गुणधर्म असल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होते
नारळाच्या तेलात फॅटी अॅसिड असल्याने त्वचा हाइड्रेट आणि हेल्दी राहण्यास मदत होते.
कोरड्या त्वचेवर नारळाचे तेल लावल्याने त्वचा मऊ आणि हाइड्रेट राहण्यास मदत होते. पण नारळाचे तेल मर्यादित प्रमाणात त्वचेवर लावावे.
तेलकट त्वचा असणाऱ्यांनी चेहऱ्याला नारळाचे तेल लावू नये. यामुळे चेहरा अधिक तेलकट होऊ शकतो.
नारळाच्या तेलाचा वापर स्किन टाइप ओखळल्यानंतर करा. जेणेकरुन नारळाच्या तेलाची अॅलर्जी असल्यास त्वचेसंबंधित समस्येपासून दूर राहाल.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.