धावपळीच्या आयुष्यात बहुतांशजण तणाव आणि चिंतेत राहतात. यापासून दूर राहण्यासाठी योगा आणि लाफ्टर थेरपीची मदत घेतली जाऊ शकते.
मानसिक समस्या दूर करण्यासाठी दररोज 5 मिनिटे खळखळून हसल्यानेही आरोग्यदायी फायदे होतात. याबद्दलच पुढे जाणून घेऊया...
लाफ्टर थेरपीमुळे डोक शांत राहण्यास मदत होते. यामुळे सकारात्मक विचार करण्यास मदत होते.
दररोज खळखळून हसल्याने शरिरातील रक्तपुरवठा सुरळीत सुरू राहण्यास मदत होते.
लाफ्टर थेरपीमुळे ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत होते. यामुळे काही आजारांपासून दूर राहू शकता.
लाफ्टर थेरपीमुळे डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. दररोज खळखळून हसल्याने एंडॉर्फिनचा स्तर वाढला जातो आणि डोकेदुखीची समस्या कमी होते.
दररोज 5 मिनिटे जोरजोरात हसल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. याशिवाय शरिराला उर्जाही मिळते.
लाफ्टर थेरपीमुळे शरिरातील कोर्टिसोल हार्मोनचा स्तर कमी होते. यामुळे मेंदू शांत राहण्यासह तणाव कमी होण्यास मदत होते.