स्वयंपाकघरातील तेलाचा डबा किंवा कढई साबणाने कितीही घासली तरी तिचा चिकटपणा लवकर जात नाही.
चिकट डब्यावर आधी थोडे खोबरेल तेल हाताने सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या. स्वयंपाकाच्या तेलापेक्षा खोबरेल तेल चिकटपणा लवकर कमी करते.
आता त्यावर गव्हाचे पीठ, मैदा किंवा घरात उरलेले कोणतेही जुने (एक्सपायर झालेले) पीठ टाका आणि हलक्या हाताने घासा.
सुके पीठ डब्यावरील जुने तेल आणि चिकटपणा पूर्णपणे शोषून घेते. यामुळे तुम्हाला डबा जास्त वेळ घासण्याची गरज पडत नाही.
यानंतर एका सुक्या टिश्यू पेपरने किंवा जुन्या सुती कापडाने डबा पुसून घ्या. सगळा चिकटपणा आणि घाण पिठासोबत सहज बाहेर येईल.
पाणी आणि साबण न वापरता फक्त २ मिनिटांत तेलाचा डबा नव्यासारखा चमकेल! हीच पद्धत तुम्ही तळणीच्या मोठ्या कढईसाठीही वापरू शकता.
सिल्क साडीवर खुलेल लूक, ट्राय करा ही Temple Jewellery
Gold Look Bangles : सोन्यासारख्या चमकणाऱ्या बांगड्या.. पाहा हे ट्रेंडी डिझाईन्स
Gold Chain Designs : 5 ग्रॅममध्ये मिळणाऱ्या सोन्याच्या चेनच्या लेटेस्ट डिझाईन्स
Long Haram : सिल्क साड्यांवर शोभून दिसणारे नेकलेस आणि लाँग हार