जर कोणतीही सोनेरी साखळी बनवण्यासाठी १०० टक्के सोन्याचा वापर केला तर तिची मजबुती कमी होते. साखळी मजबूत बनण्यासाठी सोन्यात काही प्रमाणात धातू मिसळला जातो.
जर तुम्ही मजबूत सोनेरी साखळी शोधत असाल तर १४ कॅरेटची सोनेरी साखळी निवडा. अशा साखळीत ५८.३% शुद्ध सोने असते. तसेच इतर धातूंचा वापर करून त्यांना मजबूत बनवले जाते.
१४ कॅरेटची सोनेरी साखळी तुम्ही पावसापासून ते कोणत्याही हवामानात रोज वापरू शकता. साखळीचा रंग फिकट झाल्यास पॉलिश करून वर्षानुवर्षे घालता येते.
१८ कॅरेटच्या सोनेरी साखळीत सुमारे ७५% शुद्ध सोने असते. तर २५% इतर धातू त्यांना मजबूत बनवतात. तुम्हाला आवडल्यास १४ ऐवजी १८ कॅरेटचे सोने रोज वापरू शकता.
९१.६७% शुद्ध सोन्यापासून बनवलेल्या सोनेरी साखळीची चमक वेगळीच दिसते. २२ कॅरेटची सोनेरी साखळी तुम्ही दीर्घकाळ सुरक्षित ठेवू शकता. BIS हॉलमार्कवरून साखळीच्या शुद्धतेची ओळख पटवू शकता.
कितीही कॅरेटची सोनेरी साखळी खरेदी करा, तुम्हाला सर्व प्रकारच्या डिझाइनमध्ये एकापेक्षा एक सरस डिझाइन मिळतील. तुम्ही बजेट आणि रोजच्या वापराच्या हिशोबाने विविध कॅरेटचा वापर करू शकता.