चाणक्य नीतीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या प्रत्येकासाठी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यांनी एका नीतीमध्ये सांगितले आहे की, शाकाहार किंवा मांसाहार पैकी कशात सर्वाधिक शक्ती असते.
अन्नाद्दशगुणं पिष्टं पिष्टाद्दशगुणं पयः।
पयसोऽष्टगुणं मांसं मांसाद्दशगुणं घृतम् ।।
धान्य व त्याचे पीठ शरीराला बळकट करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. धान्यापेक्षा दूध जास्त फायदेशीर आहे. दुधापेक्षा मांसामध्ये जास्त शक्ती असते व त्यापेक्षा जास्त शक्ती शुद्ध तुपात असते.
चाणक्यांच्या मते, धान्यामध्ये खूप शक्ती असते. संपूर्ण धान्यामध्ये आपल्या शरीरासाठी खूप शक्ती असते, परंतु त्याच्या पिठात संपूर्ण धान्यापेक्षा दहापट अधिक शक्ती असते.
दुधात धान्यापेक्षा जास्त शक्ती असते. हे दूध गाईचे असेल तर आणखी चांगले. दूध देखील सहज पचण्याजोगे असते, म्हणजेच ते सहज पचते. त्यामुळे बाळाला गाईचे दूध दिले जाते.
चाणक्याच्या मते, मांसाहारात दुधापेक्षा आठ पटीने अधिक सामर्थ्य असते. परंतु शास्त्रात विनाकारण जीवाला मारणे हे पाप मानले गेले आहे. यासाठी मांसाहार टाळावा.
चाणक्याच्या मते, गाईच्या दुधापासून बनवलेल्या तुपात मांसाहारापेक्षा दहापट अधिक शक्ती असते. तूप अतिशय पौष्टिक असून शरीराला शक्ती प्रदान करते. यात रोग प्रतिकारशक्ती देखील असते.