थंडीच्या दिवसात बटाटे, गाजर, मटार, कोबी, कांद्याची पात अशा भाज्या भरपूर प्रमाणात येतात. या भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
थंडीच्या दिवसात मिळणाऱ्या भाज्या स्टोर करण्यासाठी काय करावे हे बहुतांशजणांना कळत नाही. याबद्दलच्या काही ट्रिक्स जाणून घेऊया..
हिरवे मटार स्टोर करण्यासाठी त्याचे दाणे गरम पाण्यातून धुवून घ्या. यामध्ये साखर घालून उकळवा. यामधील पाणी काढून टाकत पंख्याखाली सुकण्यात ठेवा. यानंतर झीप लॉक बॅगेत भरून ठेवा.
थंडीत मिळणारा गाजर स्टोर करण्यासाठी त्याचे बारीक तुकडे करुन गरम पाण्यात अर्धा कच्चा उकडवून घ्या. यानंतर थंड पाण्यात ठेवून पुन्हा उन्हात 1-2 तासांसाठी सुकवा यानंतर फ्रिजमध्ये ठेवा.
थंडीच्या दिवसात कांद्याच्या पातीची भाजी आवर्जुन केली जाते. ही भाजी स्टोर करण्यासाठी सर्वप्रथम धुवा आणि कापल्यानंतर उन्हात सुकवा. यानंतर झीप लॉक बॅगेमध्ये भरुन फ्रिजमध्ये ठेवा.
हिरव्या लसणाची भाजी महिनाभर टिकवून ठेवण्यासाठी कापून व्यवस्थितीत सुकवून घ्या. यानंतर झीप लॉक बॅगेत भरुन फ्रिजमध्ये ठेवा.