कच्चे अंडे प्रोटीनने भरलेले असतात, जे स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि शरीराच्या दुरुस्तीसाठी उपयुक्त आहे.
कच्च्या अंड्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12, फॉस्फरस, आणि सेलेनियम मुबलक प्रमाणात असते, जे हिवाळ्यातील थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यात मदत करते.
कच्च्या अंड्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, जे थंड हवामानात उपयुक्त ठरते.
हिवाळ्यातील थंडीशी लढण्यास शरीराला उष्णता निर्माण करण्यासाठी पोषण मिळते.
अंड्यातील बायोटिन त्वचेचे पोषण करून हिवाळ्यातील कोरडेपणा कमी करतो.
च्चे अंडे खाल्ल्यामुळे बॅक्टेरिया (सॅल्मोनेला) संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त चांगल्या दर्जाची आणि स्वच्छता राखलेली अंडी खा.
कच्चे अंडे खाण्याऐवजी अर्धवट उकडलेली किंवा योग्यप्रकारे शिजवलेली अंडी खाणे जास्त सुरक्षित आणि लाभदायक असते.