"बोलण्यात फार हुशारी दाखवू नका. यश तुमच्या कृतीतून दिसले पाहिजे." हुशार व्यक्तीने आपले ज्ञान ओरडून सांगण्याऐवजी कृतीतून दाखवावे.
"तुमचे ध्येय, पैसा, कौटुंबिक गोष्टी, आणि तुमचे ज्ञान – हे कोणासोबतही उघडपणे शेअर करू नका." शहाणी व्यक्ती आपल्या खास गोष्टी काळजीपूर्वक लपवते.
"जो वेळेची किंमत ओळखतो, तोच खरा यशस्वी होतो." हुशार व्यक्ती वेळ वाया घालवत नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेतो.
"स्वाभिमानी बना, पण गर्विष्ठ होऊ नका." अहंकार माणसाला उध्वस्त करतो. पण आत्मसन्मान यश मिळवून देतो.
"दुसऱ्यांवर दोष ठेवण्याऐवजी स्वतःमध्ये सुधारणा करा." चाणक्य सांगतात की यशस्वी माणूस सतत आत्मपरीक्षण करत राहतो.
"मित्र किती जवळचा आहे हे कमी महत्त्वाचं... शत्रू किती धूर्त आहे हे ओळखणं जास्त महत्त्वाचं आहे." चाणक्य नीतीनुसार शहाण्या माणसाने मित्र आणि शत्रू यांची पारख चपखल केली पाहिजे.