Marathi

बॉलिवूड सेलिब्रेटीसारखे 7 हटके ब्लाऊज डिझाइन, नवराही लुकवर होईल फिदा

Marathi

हॉल्टर नेक पर्ल ब्लाऊज

सध्या हॉल्टर नेक पर्ल ब्लाऊजचा ट्रेण्ड आहे. अशाप्रकारचा ब्लाऊज कॉकटेल पार्टीसाठी परफेक्ट आहे. कोणत्याही रंगातील प्लेन साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज म्हणून पर्ल ब्लाऊजची निवड करू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

पफ स्लिव्ह्ज डिझाइन ब्लाऊज

लेहेंगा अथवा साडीवर पफ स्लिव्ह्ज डिझाइन ब्लाऊज सुंदर दिसते. हाताचे दंड मोठ्या असणाऱ्या महिलांसाठी पफ सिल्व्ह्ज ब्लाऊज परफेक्ट आहे. यामध्ये तुमचा लुकही अधिक खुलला जाईल.

Image credits: shehnaaz gill/instagram
Marathi

फुल स्लिव्ह्ज डीप यू नेक ब्लाऊज

जान्हवी कपूरसारखा फुल स्लिव्ह्ज डीप यू नेक ब्लाऊज शिवून घेऊ शकता. लेहेंगा अथवा साडीवर डीप यू नेक असणारा ब्लाऊज तुम्हाला हटके लुक देईल.

Image credits: jhanvi kapoor/instagram
Marathi

हेव्ही अ‍ॅम्ब्रॉयडरी वर्क ब्लाऊज

पर्ल आणि स्टोनचे वर्क असणारा ब्लाऊज रिसेप्शन पार्टीसाठी परफेक्ट आहे. यावर चोकर ज्वेलरी शोभून दिसेल.

Image credits: tamnnaah bhatia/instagram
Marathi

ब्रॉड शोल्डर वीनेक ब्लाऊज

तुमचे खांदे रुंद असल्यास ब्रॉड शोल्डर वीनेक ब्लाऊज एखाद्या पार्टीवेळी परिधान करू शकता. यावर मोत्याची अथवा कुंदन ज्वेलरी शोभून दिसेल.

Image credits: mrunal thakur/instagram
Marathi

क्रिस क्रॉस दोरी वर्क ब्लाऊज

सिंपल आणि सोबर लुकमध्येही चारचौघात हटके दिसण्यासाठी क्रिस क्रॉस दोरी वर्क ब्लाऊज परिधान करू शकता. यावर कानात मोठे झुमके घालू शकता.

Image credits: pinterest
Marathi

बंदगळा स्टाइल ब्लाऊज

एलिगेंट लुकसाठी मौनी रॉयसारखा बंदगळा असणारे ब्लाऊज परिधान करू शकता. यावर एथनिक ज्वेलरी नक्कीच सूट होईल.

Image credits: Mouny roy/instagram

'Munjya' सिनेमातील अभिनेत्रीचे 8 हटके ब्लाऊज डिझाइन, दिसाल बोल्ड

लग्नात नवऱ्यासोबत मॅच करायचं आहे ? राधिका अनंत सारखे 7 ड्रेस ट्राय करा

लग्नात आणि पार्टीत सेलेब्रिटी लुक हवा आहे ? ट्राय करा हे 11 लेहेंगे

Saiee Manjrekar सारखे 8 एथनिक लुक 5K मध्ये करा रिक्रिएट, दिसाल कातिल