बाजरीची भाकरी थापताना फाटते? वापरा या 4 Kitchen Tips
Lifestyle Dec 24 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
बाजरीच्या भाकरीचे फायदे
बाजरीमध्ये सोडियम, प्रोटीन, फायबर आणि कार्बोहाइड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पचनक्रिया सुधारण्यासह पोटासंबंधित समस्या दूर होतात.
Image credits: social media
Marathi
बाजरीची भाकरी तयार करण्यासाठी टिप्स
बाजरीची भाकरी थापताना काहीजणांची तुटली जाते. यावेळी काय करावे याबद्दल पुढे जाणून घेऊया…
Image credits: social media
Marathi
ताजं पीठ घ्या
चपातीच्या पीठाप्रमाणे बाजरीची भाकरी तयार करताना एकाचवेळी अधिक पीठ मळून ठेवू नका. भाकरीसाठी ताज पीठ घेऊन मळल्यानंतर लगेच भाकरी थापण्यास सुरुवात करू नका.
Image credits: social media
Marathi
पीठ मळण्याची पद्धत
पीठ मळताना हाताने व्यवस्थितीत मऊसर आणि थोडं घट्ट असू द्या. याशिवाय पीठ मळताना त्यामध्ये हळूहळू पाणी मिक्स करा.
Image credits: social media
Marathi
कोमट पाण्याचा वापर
भाकरीचे पीठ तयार करताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा. थंड पाण्याचा वापर केल्यास पीठ चिकट होते.
Image credits: social media
Marathi
भाकरी भाजण्याची खास ट्रिक
भाकरी नेहमीच मध्यम आचेवर भाजावी. उच्चम गॅसच्या आचेवर भाजल्यास चव आणि रंगही बिघडू शकतो. याशिवाय भाकरी भाजताना पीठ लागलेला भाग वरच्या बाजूस ठेवा.