यंदा अक्षय्य तृतीया 10 मे रोजी आहे. या दिवशी काही कामे चुकूनही करू नये. अन्यथा आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणावरही रागवू नका. जरी एखाद्याकडून चूक झाल्यास त्याला माफ करा. या दिवशी राग व्यक्त केल्याने आयुष्यात काही प्रकारचे नुकसान होऊ शकते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. यामुळे एखादा भिक्षुकाने भोजनाची इच्छा व्यक्त केल्यास त्याला रिकाम्या हाती पाठवू नका.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अजिबात मनात वाईट विचार आणू नका. केवळ सकारात्मक विचार करा, जेणेकरुन आयुष्यात शुभ फळ मिळेल.
अक्षय्य तृतीयेच्या दिवस शुभ मानला जातो. यामुळे मांसाहार अथवा मद्यपान अक्षय्य तृतीयेला करणे टाळावे. अन्यथा आयुष्यात संकटांचा सामना करावा लागू शकतो.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काळ्या रंगातील वस्र अजिबात परिधान करू नका. अन्यथा आयुष्यात पूर्ण होऊ पाहणारी कामे बिघडतील.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.