बिघडलेल्या लाइफस्टाइलचा केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. काहींना केसगळती ते टक्कल पडण्याची समस्या उद्भवते. याच समस्येपासून दूर राहण्यासाठ कोणते तेल लावावे जाणून घेऊया.
बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. बदामाच्या तेलामुळे केसांना फाटे फुटण्याची समस्या दूर राहते.
ऑलिव्ह ऑइल केसगळतीवर रामबाण उपाय आहे. याशिवाय केसांची वाढ होण्यासह कोंड्याची समस्या ऑलिव्ह ऑइलमुळे दूर राहते.
एरंडीच्या तेलात अँटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन आणि फॅटी अॅडिस असते. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळण्यासह केस मजबूत होतात.
रोजमेरीचे तेल केसांच्या वाढीसाठी मदत करते. दररोज रोजमेरीच्या तेलाचे 2-3 थेंब केसांना लावून मसाज केल्याने केसांची उत्तम वाढ होते.
नारळाचे तेल केसांना खोलवर हाइड्रेट ठेवण्यास मदत करते. याशिवाय केसांना प्रोटीन मिळण्यासह केस मजबूत आणि मऊ होतात.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.